रिअल इस्टेट आणि एनबीएफसी

बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनी एनबीएफसीमध्ये निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम हा आर्थिक क्षेत्राबरोबरच रिअल इस्टेट बाजारावरही पडू शकतो. आयएल अँड एफएसच्या कर्ज परतफेडीतील चुकीमुळे एनबीएफसी क्षेत्र सध्या संकटाशी सामना करत आहे. मार्च 2018 पर्यंत या कंपन्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला दिलेल्या एकूण कर्जापैकी 7.5 टक्के म्हणजेच 1.65 लाख कोटी रुपये कर्ज दिले आहे. परंतु अनुत्पादित कर्जाच्या (एनपीए) वाढत्या ओझ्यामुळे बॅंकिंग प्रणालीने रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसाह्य करणे बंद केले आहे. अशा स्थितीत रोख रकमेच्या टंचाईचा सामना करणाऱ्या विकासकांसाठी एनबीएफसी आणि एचडीएफसी हेच एक आशेचे स्थान आहे. म्हणून एनबीएफसी क्षेत्रातील संकट लवकरात लवकर दूर करणे हे रिअल इस्टेटसाठी गरजेचे आहे. अन्यथा रिअल इस्टेट क्षेत्रातील होणारी सुधारणा आणखी काही महिन्यांसाठी टाळली जाऊ शकते.

सध्याच्या काळात बिगर बॅंकिंग आर्थिक कंपन्यांना रोकड टंचाईचा सामना करत आहे. यामुळे विकासकांना अर्थपुरवठ्यात कमतरता निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम रिअल इस्टेटवर पडणे साहजिकच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोकड टंचाईचा असाही परिणाम : लोन अगेंस्ट प्रॉपर्टीच्या बाजारात नॉन बॅंकिंग फायनान्स कंपन्या वेगाने विकास करत असताना अलीकडच्या काळात हा बाजार ठप्प पडलेला दिसून येतो. कारण, या क्षेत्रात कंपन्यांना अधिक व्याप्ती वाढवण्याची इच्छा दिसून येत नाही. लहान व्यावसायिकांना फायदेशीर असणाऱ्या या लोकप्रिय पद्धतीमुळे गेल्या पाच वर्षांत या कंपन्यांचे काम खूप वाढले होते. मात्र, अलीकडच्या काळात एनबीएफसीकडे रोख रकमेचा वानवा असल्याने आणि कॉस्ट ऑफ फंडमध्ये अडीच टक्के पॉंईटची वाढ झाल्याने लोन अगेस्ट प्रॉपर्टी व्यवसाय आता फायदेशीर राहिलेला नाही. जोपर्यंत बाजाराची स्थिती सामान्य होत नाही आणि रोख रक्कम वाढत नाही, तोपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्‍यता अधिक आहे.

मोठ्या शहरात वाढल्या किमती : यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील मोठ्या दहा शहरातील घराच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी साडेपाच टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. आरबीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या तिमाहीची तुलना केल्यास या शहरातील घराची किंमत सरासरी अडीच टक्‍क्‍यानी वाढल्याचे दिसते. आरबीआयने देशातील दहा शहरात हाऊसिंग रजिस्ट्रेशन अॅथॉरिटीकडून मिळालेल्या आकड्यांच्या आधारावर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या शहरात मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कानपूर आणि कोचीचा समावेश आहे.

आरबीआयच्या मते, यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत देशभरात ही ग्रोथ 5.3 टक्के इतकी राहिली. त्याअगोदरच्या तिमाहीत ही वाढ 6.7 टक्के इतकी होती. एक वर्षाअगोदर याच कालावधीत हीच वाढ 8.7 टक्के इतकी होती. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार दिल्ली वगळता अन्य शहरात घराच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे.

– विश्‍वास सरदेशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)