राहूल गांधींनी स्पष्ट केले ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधाचे कारण

लंडन (ब्रिटन): ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधाबाबत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या पक्षाचा ट्रिपल तलाक विधेयकाला नाही, तर त्यातील गुन्हेगारीकरणाला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयात आणि संसदेताही या विधेयकाला कॉंग्रेसच्या विरोधाबाबतच्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

कॉंग्रस ट्रिपल तलाक विधेयकाला विरोध करत असल्याचा आरोप भाजप करत असतो. हे विधेयक 29 डिसेंबर 2017 रोजी लोकसभेत मंजूर झाले आहे, मात्र राज्यसभेत त्याला मंजुरी मिळायची आहे. हे विधेयक सर्वांगीण विचारासाठी निवड समितीकडे पाठवावे अशी कॉंग्रेसची मागणी आहे. प्रस्तावित विधेयकानुसार कोणीही पुरुष आपल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणून तलाक देऊ शकणार नाही. तसे करणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद आणि दंड्‌ होऊ शकतो. पोलीस त्याला वॉरंटशिवाय अटक करू शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्रिपल तलाकामुळे आमच्या मुस्लीम भगिनींचे जीवन बरबाद झालेले आहे. ज्यांना तलाक मिळालेला नाही त्यांच्या डोक्‍यावर ट्रिपल तलाकची तलवार सतत टांगलेली असते. त्या भयभीत जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी हे विधेयक आहे. मात्र काही लोक हे विधेयक मंजूर होऊ देत नाहीत. कॉंग्रेस नामदारांच्या (राहुल गांधींच्या) मनात मुस्लिम महिलांबाबत काही भावना आहेत की नाहीत, असाही प्रश्‍न नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता उत्तर प्रदेशातील एका रॅलीत केला होता. त्याबाबत राहुल गांधीनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)