राहुल रावण तर प्रियंका शुर्पणखा : भाजप आमदारचे वादग्रस्त वक्तव्य

बलिया (उत्तर प्रदेश) : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंघ यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. सिंघ यांनी राहुल गांधी यांची तुलना रामायणातील रावणाशी तर प्रियंका यांची तुलना रावणाची बहीण शुर्पणखा हिच्याशी केली आहे.

यावेळी बोलताना सिंघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भगवान रामाशी करतानाच रावणाच्या लंकेवर प्रभू श्री राम नक्कीच विजय मिळवतील असं देखील म्हंटल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंघ यांनी आपले वक्तव्य सिद्ध करण्यासाठी रामायणाचा दाखल दिला असून ते म्हणतात की, “ज्या प्रमाणे रामायणामध्ये रावणाने रामाचा प्रभाव करण्यासाठी बहीण शुर्पणखा हिची मदत घेतली होती त्याचप्रमाणे राहुल गांधींनी त्यांची बहीण प्रियंका यांची मदत रामरूपी मोदींना हरवण्यासाठी घेतली आहे. मात्र सर्वानाच माहित आहे की शेवटी विजय रामाचाच होणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)