राहुल यांच्याकडे पंतप्रधानपदासाठीची पुर्ण क्षमता : तेजस्वी यादव

भाजपच्या बदनामीच्या मोहीमेनंतरही राहुल लोकप्रियच

पाटणा : एम. के स्टॅलिन, कुमारस्वामी यांच्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यास पुर्ण अनुकुलता दर्शवली आहे. राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान बनण्यासाठीची सर्व आवश्‍यकते गूण आहेत असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचा आयटीसेल राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी कोट्यावधी रूपयांची रक्कम सध्या खर्ची घालत आहे पण त्याचा काही एक उपयोग होणार नाहीं असेही त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापि विरोधी आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार सन 2019 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांच्यातील पंतप्रधानपदाच्या क्षमतेबाबत कधीच प्रश्‍न चिन्ह नव्हते. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने इतकी बदनामिकारक मोहीम राबवूनही लोकांची मने जिंकण्यात ते यशस्वी झाले आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

तीन राज्यांत कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेस मध्येही चैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या नेतृत्वात विश्‍वास निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. त्यांचे आज पाच राज्यांत मुख्यमंत्री आहेत आणि देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी आत्मविश्‍वासाने करीत आहेत त्यामुळे त्यांच्या क्षमतेविषयी प्रश्‍न चिन्ह उपस्थित करण्याचे कारणच नाही. लोकसभेतील सदस्यत्वाचा त्यांना तब्बल पंधरा वर्षांचा अनुभव आहे असेही तेजस्वी यादव यांनी निदर्शनाला आणून दिले.

भारतीय जनता पक्ष सध्या एकाच व्यक्तीच्या पुजनात दंग आहे त्यांच्या सारखी हुकुमशाही राजवट आम्हाला नको आहे त्यामुळे निवडणुनंतर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन देशाचा पंतप्रधान निवडतील अशी माहिती त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)