राहुल यांच्याकडून पंतप्रधानांवर डाटा लीक करण्याचा आरोप

नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या अधिकृत ऍपवरून नागरिकांच्या डाटाची कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय चोरी करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. फ्रेंच हॅकरने अलिकडेच चोरलेल्या डाटाबाबत दिलेल्या स्पष्टिकरणाच्या आधारे राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “नमो ऍप’ या अधिकृत ऍपवरून या डाटाची चोरी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“नमस्कार माझे नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेंव्हा तुम्ही माझ्या ऍपवरून साईन इन कराल, तेंव्हा तुमचा डाटा मी अमेरिकेतील कंपन्यांमधील मित्रांना देईन.’ असा उपहासात्मक आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे. डाटा चोरीचे प्रकरण थेट पंतप्रधान मोदींच्या दारापर्यंत अशा आशयाचे वृत्तही राहुल गांधी यांनी ट्विटर पोस्टला अटॅच केले आहे. या बातमीमध्ये फ्रेंच हॅकरच्या कबुलीजबाबाचा तपशील देण्यात आला आहे.
या प्रकरणातील सत्यता माध्यमे दडपत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपाचा भाजपाकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. कॉंग्रेस अध्यक्षांकडून यापेक्षा अधिक चांगली अपेक्षा करता येऊ शकत नाही. राहुल गांधी यांच्या खोट्या आरोपाच्या विसंगत पंतप्रधानांच्या ऍपवरील डाटा गुगल ऍनालिटीक्‍सप्रमाणेच केवळ विश्‍लेषणासाठीच वापरला जातो, असे बीजेपी4इंडिया या ट्‌विटरवर म्हटले गेले आहे. राहुल गांधी यांनी “नमो ऍप’ डाऊनलोड करावे आणि देशात काय चांगले घडते आहे, याची माहिती घ्यावी, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या ऍपवरून कोणतीही वैयक्तिक डाटाची परवानगी न विचारता “गेस्ट मोड’मधून वापराची सुविधा आहे. काही ठराविक कारणासाठीच वैयक्तिक डाटाची परवानगी मागितली जाते, असे भाजपाने म्हटले आहे. राहुल गांधी यांची नरेंद्र मोदींशी तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या सांगकाम्यांच्या “नमो ऍप’ डिलीट करण्याच्या आवाहनामुळे या ऍपची लोकप्रियता वाढलीच आहे, असेही भाजपाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)