हैदराबाद – दोन दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर आलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेलंगणातील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी व्यक्तीगत स्वरूपात चर्चा करतानाच पक्षाच्या निवडणुक यंत्रणेला चालना देण्याचे काम केले. यावेळी त्यांनी प्रथमच राज्यातील बुथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी टेलिकॉन्फरन्सींग द्वारे चर्चा केली.

पक्षाने राखीव जागांवरील उमेदवारांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम सुरू केला आहे त्या विषयीचे सादरीकरण त्यांच्यापुढे करण्यात आले.पक्षाचे नेते पी सुधाकर रेड्डी यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या आजच्या बैठकीत त्यांनी पक्षाच्या आजी-माजी आमदार व खासदारांशी व्यक्तीगत स्वरूपात चर्चा करताना पक्षाच्या स्थितीची माहिती घेतली. काल त्यांनी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिला बचत गटांना भरीव आर्थिक मदत केली जाईल अशी ग्वाहीं राहुल गांधी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)