राहुल फटांगळेच्या मृत्यूप्रकरणी एका संशयीत ताब्यात

पुणे,दि.13-कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभागकाडून (सीआयडी) नुकतीच जारी करण्यात आली होती. या चार संशयीतांपैकी एका संशयीताला चतुश्रृंगी पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्याला सोलापूर जिल्हयातील टेंभुर्णी येथून ताब्यात घेण्यात आले. अधिक तपासासाठी त्याला सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे.
1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. त्यानंतर सीआयडीने आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्र व व्हिडीओ क्‍लिप जारी केली. या आरोपींबाबत माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले होते. त्यातील हा एक संशयीत आहे.

राहुल फटांगळे हत्या प्रकरणी एक व्हिडीओ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) हाती आला आहे. या व्हिडीओमध्ये फटांगळेला काही व्यक्ती काठीने मारत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे सीआयडी चार संशयितांची छायाचित्र पत्रकार परिषद घेऊन प्रसिध्द केली होती. आरोपींबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी सीआयडीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिक्रापुर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा तपास 5 फेब्रुवारी रोजी सीआयडीकडे सोपविण्यात आला होता.
फटांगळे हत्या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोन जण अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. तर एकजण औरंगबादचा रहिवासी आहे. त्यांच्याविरुद्ध एप्रिल महिन्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर व्हिडीओच्या आधारे सीआयडी आणखी चार संशयितांचा शोध घेत होती. यातील एक संशयीताबद्दल चतुश्रृंगी पोलिसांना खबर मिळाली . त्याला बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असल्याने त्याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातून देण्यात आली.चतुश्रृंगी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनूसार टेंभुर्णी येथून आरोपीला अटक केली. व्हिडीओ क्‍लिपमधील चेहरा व प्रत्यक्षातील आरोपी तोच असल्याची माहिती उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

… असे आहे प्रकरण
कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 1 जानेवारी रोजी 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा करत असताना, परिसरात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकदेखील झाली. यात राहुल फटागंळेला जमावाने मारहाण केल्याने त्याचा मृत्यु झाला होता.

सीआयडीला स्थानीक पोलिसांकडून दंगलीची व्हिडीओ क्‍लीप मिळाली आहे. फटांगळेला मारहाण करणा-याचे फोटो त्या क्‍लिपवरून काढण्यात आले आहेत. या क्‍लिप व फोटोमधील व्यक्तींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीशी संपर्क साधावा. त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)