राहुल द्रविड आयसीसीच्या “हॉल ऑफ फेम’ मध्ये दाखल

तिरुवनंतपुरम: भारताचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय ज्युनिअर संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला आयसीसीचे बहुप्रतिष्ठीत हॉल ऑफ फेमचे सन्मानपत्र भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावस्करयांच्या हस्ते प्रदाण करण्यात आले. हा सन्मान मिळवणारा द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. बीसीसीआयने या छोट्याखानी सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीयोमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी द्रविडला कॅप दिली. याआधी बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिल देव आणि अनिल कुंबळे या भारतीय खेळाडूंना आयसीसीने हा सन्मान दिला आहे. या दिग्गजांच्या पंक्तित आता राहुल द्रविडला स्थान मिळाले आहे. आयसीसीने 2 जुलैला भारताच्या राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिग यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करणार असल्याची घोषणा केली होती. तिरुवनंतपुरममध्ये भारत विरुध्द वेस्ट इंडिज यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला त्याचे सन्मानपत्र देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावस्करांनी सन्मानपत्र दिल्यानंतर राहुल द्रविड प्रतिक्रिया देताना म्हणाला “हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे ही सन्मानाची बाब आहे. तुमचे नाव क्रिकेट इतिहासातील दिग्गजांच्या पंक्तीत असणे हे एखाद्या खेळाडूसाठी स्वप्नवत असते. याबाबत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिग यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले “आयसीसी हॉल ऑफ फेम द्वारा आसीसी ग्रेट प्लेयर्सचा सन्मान करते. फक्त जागातील सर्वोकृष्ट खेळाडूंनाच त्यांच्या योगदानाबद्दल हा मान दिली जातो.’ राहुल द्रविडने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 164 कसोटीत 13 हजार 288 धावा तर 344 एकदिवसीय सामन्यात 10 हजार 889 धावा केल्या आहेत. राहुलने कसोटीत 36 तर एकदिवसीयमध्ये 12 शतक केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)