राहुल गांधी १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसने जोरदार मार्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसने प्रचारातही आघाडी घ्यायची रणनिती आखली आहे. या आघाडीचा भाग म्हणूनच पक्षाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत.
कॉंग्रेसचा २०१४ मध्ये झालेला दारून पराभव, त्यानंतर सातत्याने सुरू झालेली पराभवाची मालिका, ही मालिका उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपर्यंत चालली. पण, गुजरात विधानसभा निवडणुकीने या पराभवाला छेद दिला. अर्थात गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पराभवच झाला. पण, या निवडणुकीत काँग्रेसने प्रंचंड मोठी झेप घेतली. इतकी, की काँग्रेसच्या प्रगतीपुढे भाजपचा विजयही झाकोळून गेला.  दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे अॅन्टीइन्कबंन्सीचा धोका ओळखून काँग्रेस कामाला लागले आहे. या वेळी थेट सामना काँग्रेस विरूद्ध भाजप असाच आहे. त्यामुळे भाजपच्या आक्रमक प्रचाराला कसे सामोरे जायचे यावर काँग्रेसमध्ये जोरदार तयारी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
2018 मध्ये विधानसभा निवडणुकांची सुरूवातच कर्नाटकमधून होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या या राज्यात सत्ता कायम राखत विजयी सुरूवात करण्याचा काँग्रेसचा मनसूबा आहे. त्यामुळे काँग्रेस  कामाला लागला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)