राहुल गांधी यांनी घेतली लालूप्रसाद यादव यांची भेट

नवी दिल्ली :  चारा घोटाळाप्रकरणी दोषी सिद्ध झाल्लेले राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव हे सध्या दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लालूंची रूग्णालयात जावून भेट घेतली आहे. लालू सध्या त्याच्या किडनी आणि हृदयाशी संबंधित आजारावर उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात त्यांचा छोटा मुलगा तेजस्वी यादव यांनी लालूंची भेट घेतली होती.

मागील १५ दिवसांपासून लालूप्रसाद यादव यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी ही भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच लालूप्रसाद यादव हे इथे मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेविषयी समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)