राहुल गांधी यांनी घेतली करूणानिधींची भेट

चेन्नई – तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.करूणानिधी यांना आणखी काही दिवस रूग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 94 वर्षीय करूणानिधी यांची येथील कावेरी रूग्णालयात भेट घेतली.

प्रकृती खालावल्याने करूणानिधी यांना 28 जुलैला रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. वृद्धापकाळामुळे त्यांची सर्वसाधारण प्रकृती खालावली आहे. असे असले तरी त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे समजते.

रूग्णालयात जाऊन विविध पक्षांचे नेते करूणानिधी यांची भेट घेत आहेत. आज राहुल यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी करूणानिधी यांचे पुत्र आणि द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन, कॉंग्रेस नेते मुकूल वासनिक हेही उपस्थित होते. करूणानिधी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाच्या आवारात द्रमुकच्या कार्यकर्त्यांचीही गर्दीही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)