राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्र्यांची जीभ घसरली

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.अश्विनी चौबे यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. राहुल गांधी यांना मानसिक आजार झाला असून त्यांना मनोरूग्णालयात भरती केले पाहिजे, असे म्हणत चौबे यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात आणखीही काही असंसदीय शब्द वापरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला उत्तर देताना अश्विनी चौबे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकार आभाळासारखा आहे. विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष त्या तुलनेत किरकोळ आहेत. देशाच्या पंतप्रधानांना अपशब्द वापरणारे कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्षच स्वतः क्षुल्लक आहेत आणि तेच स्वतःच कॉंग्रेसमुक्त भारत करतील, असे अश्विनी चौबे म्हणाले. शिवाय सरकारविरोधात उघडण्यात आलेल्या महाआघाडीतील नेत्यांना जनतेचा शाप लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अश्विनी चौबे यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावरही निशाणा साधला. जनावरांचा चारा खाणारे आज तुरुंगात आहेत. ज्या गरीबांना आरजेडी नेत्यांनी धोका दिला, त्यांच्या शापामुळे ते आयुष्यभर तुरुंगात राहतील, असेही चौबे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)