राहुल गांधी यांची आज “जन आक्रोश रॅली’

रामलीला मैदानावर जाहीर सभा : कॉंग्रेसच्या युवा टीमकडून जय्यत तयारी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरूध्द कॉंग्रेसची “जन आक्रोश रॅली’ उद्या, रविवारी रामलीला मैदानावर होत आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या या पहिल्या रॅलीला यशस्वी करण्यासाठी युवा टीमकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मे महिन्यात चार वर्षे पूर्ण होत आहे. एकीकडे सरकार उत्सवाची तयारी करीत आहे, तर दुसरीकडे सरकारच्या फुग्यातील हवा काढण्यासाठी कॉंग्रेस उद्या “जन आक्रोश रॅली’ करीत आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची ही पहिलीच सभा होय. यामुळे संघटन महासचिव अशोक गहलोत यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. राजस्थान, हरयाणा आणि उत्तरप्रदेशातून जास्तीत जास्त लोकांना दिल्लीत आणण्याचे प्रयत्न आहे. उद्याच्या रॅलीत जवळपास दोन लाख लोक येतील असा कॉंग्रेसचा दावा आहे.

जम्मूतील कठुआ आणि यूपीच्या उन्नावमधील बलात्काराच्या प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. यानंतरही अत्याचाराची मालिका अखंडित सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऍट्रासिटी प्रकरणी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हमी भावाचा प्रश्नही कायम आहे.

यामुळे राहुल गांधी उद्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चांगला समाचार घेतील, अशी शक्‍यता आहे. 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचाही प्रयत्न होईल. दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात कॉंग्रेसने अलिकडेच आयोजित केलेल्या “संविधान बचाव’ संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)