राहुल गांधी म्हणजे लादलेल्या मोठेपणाचे उदाहरण – योगी आदित्यनाथ

लखनौ (उत्तर प्रदेश) – राहुल गांधी म्हणजे लादलेल्या मोठेपणाचे उदाहरण अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर टीका केली. भाजप ओबीसी मोर्चाद्वारा विश्‍वेशरैया हॉलमध्ये आयोजित लोधी समाज प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते.

दुसऱ्यांनी लादलेल्या मोठेपणामुळे माणूस मोठा होत नाही, तर अंगच्या गुणांमुळे, कर्तृत्वामुळे, पुरुषार्थामुळे माणूस मोठा बनतो, असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण समोर ठेवले. या गुणांमुळेच नरेंद्र मोदींना आज मोठेपणा प्राप्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांगना अवंती बाई यांचे स्मरण करून योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या नावाने एटा येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्याई घोषणा केली. कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची निवेदने ही लोकशाहीसाठी घातक असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी निदर्शनास आणून दिले. देशाच्या अखंडतेला हानिकारक नक्षली संघटनांना कॉंग्रेस नेते खुले समर्थन देत आहेत असे योगींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)