राहुल गांधी देशातील सर्वात मोठा विदुषक

हैदराबाद – विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर लगेचच तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. राहुल गांधी हे देशातील सर्वात मोठे विदुषक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणमधील टीआरएस सरकारविरोधात बिनबुडाचे, विचित्र आणि निरर्थक आरोप करणारा कॉंग्रेस पक्ष हा तेलंगणचा सर्वात मोठा शत्रू आहे.

तेलंगणसाठी कॉंग्रेस पक्ष हा खलनायक आहे, अशी टीका राव यांनी केली. राव यांनी पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसवर जरी टीकेची झोड उठवली असली तरी त्यांनी भाजपवर मात्र कोणतीही टीका केली नाही.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेतील अविश्‍वास ठरावाच्यावेळी पंतप्रधानांना आलिंगन दिले आणि त्यानंतर डोळे मिचकावल्याच्या संदर्भाने बोलताना राहुल गांधी म्हणजे देशातील सर्वात मोठे विदूषक असल्याची टीकाही राव यांनी केली.

हैदराबादेतील खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा “एआयएमआयएम’ या पक्षाबरोबर मित्रत्वाचे संबंध असल्याचे सांगून त्या पक्षाबरोबर टीआरएस यापुढेही काम करत राहिल, असे राव यांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणूकीत मात्र तेलंगण राष्ट्र समिती कोणाशीही आघाडी करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)