राहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत – रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली: राफेल डीलवरून भाजपवर सतत टीकास्त्र सोडणारे राहुल गांधीना भाजपने चांगलेच धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘चोर’ संबोधले होते. यावर भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधींवर चांगलीच टीका होत आहे.

दरम्यान, केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी चोर असून त्यांचा संपूर्ण परिवार कमिशनवर जिवंत असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वातंत्र्य भारतात अजूनही पंतप्रधानावर अश्या शब्दात कोणी टीका केली नाही. नरेंद्र मोदी यांचे व्यक्तित्व इमानदार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर पाकिस्तान सोबत मिली-भगत असल्याचा आरोप केला आहे. ” राहुल गांधी देशाच्या सुरक्षेवरून पाकिस्तान सोबत मिळून खेळ खेळत आहेत. ज्याप्रकारे राहुल गांधी बोलतात त्याच प्रकारे पाकिस्तानचे नेते देखील बोलतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)