राहुल गांधी आणि काँग्रेसला टेक्नॉलॉजीचे शून्य ज्ञान-भाजप

नवी दिल्ली : नमो अॅपवरून आता काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. कारण नमो अॅपच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी मोदींवर निशाणा साधला होता. त्याला आता भाजपानंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला टेक्नॉलॉजीचे शून्य ज्ञान असल्याचा पलटवार भाजपानं केला आहे. केम्ब्रिज एनालिटिकाशी काँग्रेसच्या असलेल्या संबंधावरून लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींनी नमो अॅपचा मुद्दा उपस्थित केला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.

भाजपाने राहुलच्या ट्विटला जोरदार विरोध केला आहे. राहुल आणि त्यांचा पक्ष लोकांमध्ये टेक्नॉलॉजीसंदर्भात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस पक्ष स्वतःकडच्या ‘ब्रह्मास्रा’द्वारे केम्ब्रिज एनालिटिकाच्या माध्यमातून लोकांचा डेटा चोरी करत आहेत. या अॅपद्वारे मोदींनी त्यांच्या लाखो कार्यकर्ते आणि चाहत्यांना त्यांच्याशी थेट संपर्क करण्याचे माध्यम उपलब्ध करून दिले आहे, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नमो अॅपला टीकेचे लक्ष्य केले होते. या ट्विटमध्ये राहुल गांधी लिहितात, “हाय, माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत अॅपमध्ये साइन इन करता तेव्हा मी तुमची सगळी माहिती अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो.” नमो अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींची खासगी माहिती त्यांची कुठलीही परवानगी न घेता अमेरिकन कंपन्यांना पुरवली जात असल्याचा आरोप होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)