राहुल गांधी असमंजस नेते : उमा भारती 

इंदूर:राहुल गांधी हे गांभीर्याचा अभाव असलेले नेते आहेत. महत्त्वाच्या विषयावरही त्यांनी अयोग्य वक्‍तव्य केली आहेत. त्यांचे आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे मतही तसेच आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी म्हटले आहे.

निवडणूक प्रचारावेळी त्या म्हणाल्या, केंद्र सरकारने आणि मध्य प्रदेशातील राज्य सरकारने उत्तम काम केले आहे. त्यामुळे भाजपाचे या निवडणुकात पारडे जड झाल्यामुळे कॉंग्रेस बेजबाबदार वक्‍तव्य करीत आहे. राहुल गांधी यांना कोणताही दौरा म्हणजे सहलीचे ठिकाण वाटते, अशी खोचक टीकाही उमा भारती यांनी केली. त्या येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्या होत्या.

-Ads-

यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षावर टीका केली. राहुल गांधी कुठेही दौऱ्यासाठी गेले म्हणजे छायाचित्र काढायची संधी मिळते. परदेश दौरे त्यांच्यासाठी जणू सहलीचे ठिकाण असते. इतकी अपरिपक्व वागणूक असणाऱ्यांना देश चालवता येत नाही, असे उमा भारती यांनी म्हटले.

तसेच मध्य प्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांचीही त्यांनी यावेळी खिल्ली उडवली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये जाऊन शिकावे, असा टोला त्यांनी हाणला. सध्या मध्य प्रदेशातील वातावरण निवडणुकीमुळे तापले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या जाण्यावर बॅन लावण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत बोलताना भारती यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत संघावर बंदी लावता येणार नाही. उमा भारती म्हणाल्या, संघ ही एक राष्ट्रवादी विचारप्रणाली आहे. सर्वांच्या ती मनात असल्यामुळेच संघ कधीही कार्यकर्त्यांची अधिकृत नोंदणी करत नाही.

आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, आमच्यामध्ये संघ जिवंत राहील. मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने म्हटले की, कॉंग्रेसची सत्ता आल्यास सरकारी कार्यालये आणि परिसरात संघाच्या शाखा भरवू देणार नाही. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या शाखांमध्ये जाण्याची परवानगी देणारा निर्णयही पक्ष मागे घेईल, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)