राहुल गांधी अकल सै बिलकुल पैदल है क्या?; नकवी यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली – केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधीजी अकलसे बिलकुल पैदल है क्या? असं वक्तव्य नकवी यांनी केलंय. दरम्यान नकवी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

फेसबुक डाटा लीक प्रकरणी राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. सरकार डाटा लीकचे प्रकरण समोर आणून  ३९ भारतीयांना इराकमध्ये ठार करण्याच्या  घटनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं राहुल गांधी यांनी म्हंटल होतं. दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना नकवी यांनी म्हंटल आहे की,  राहुल गांधीजी अकलसे  पैदल है क्या? त्यांना हे समजायला हवे की भोळ्या भारतीयांचा डाटा चोरीचे ( फेसबूक डाटा लीक) प्रकरण गंभीर आहे. यात सामील होणाऱ्यांचा पर्दाफाश होत असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)