राहुल गांधींनी ‘या’ रोगाने ग्रासलंय : अमित शहा 

मध्यप्रदेश : मध्यप्रदेश निवडणुकांसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून काँग्रेस व भाजपा एकमेकांवर सडकून टीका करीत आहेत. दरम्यान आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी नरसिंगपूर येथील जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, राहुल यांना ‘मोदी फोबिया’ झाला असल्याचं म्हंटल आहे.

“विरोधकांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सुटका हवी आहे, परंतु पंतप्रधानांना मात्र गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण इत्यादी गहन समस्यांपासून देशाची सुटका हवी आहे.” अशी मार्मिक टीका शहा यांनी यावेळी बोलताना केली.

-Ads-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करताना शहा म्हणाले की, “मोदी यांनी ४ वर्षांच्या कालावधीमध्ये १२९ योजनांची घोषणा केली आहे. काँग्रेसने चार पिढ्यांमध्ये काय केले याचे रिपोर्ट कार्ड द्यावे.”

एका रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधींनी २२ मिनिटांच्या भाषणात ४४ वेळा मोदींचे नाव घेतले, हे ऐकून राहुल काँग्रेसचा प्रचार करीत आहेत की भाजपचा असा प्रश्न आपल्याला पडल्याचे सांगत शहांनी राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
135 :thumbsup: Thumbs up
36 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)