राहुल गांधींना ते सुपर व्हीव्हीआयपी असल्याचे वाटते – भाजप

नवी दिल्ली – कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रजासत्ताक दिनी झालेल्या मुख्य सोहळ्यात सहाव्या रांगेतील आसन देण्यात आल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावरून कॉंग्रेसवर पलटवार करताना भाजपने राहुल यांना ते सुपर व्हीव्हीआयपी असल्याचे वाटते, असे म्हटले आहे.

देशाच्या राजधानीत शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य सोहळा झाला. त्या सोहळ्यात राहुल यांना सहाव्या रांगेतील आसन देण्यात आले. त्यानुसार राहुल निर्धारित आसनावर स्थानापन्नही झाले. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या आसनावरून कॉंग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली. थिल्लर राजकारणात गुंतलेल्या केंद्र सरकारने परंपरा मोडित काढली, असे कॉंग्रेसने म्हटले. या टीकेचा समाचार भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जी.व्ही.एल.नरसिंह राव यांनी घेतला. कॉंग्रेससारख्या 133 वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या पक्षाला हे शोभणारे नाही.

कॉंग्रेस सत्तेत असताना भाजपच्या नेत्यांनाही अशीच वागणूक देण्यात आली. मात्र, आम्ही कधीच त्याचा मुद्दा बनवला नाही. लोकशाहीनुसार कृती करून आम्ही कायदा आणि नियमांचे पालन करतो. राहुल यांना शिष्टाचारानुसार आसन देण्यात आले, असे राव यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)