राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून मानहानीचा खटला

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँकेच्या प्रकरणात फरार असलेला नीरव मोदी व ललित मोदी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली तुलना राहुल गांधी यांना चांगलीच महागात पडलीये. उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्हा न्यायालयात भाजपाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात शुक्रवारी मानहानीचा खटला दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान मोदींची नीरव मोदी व ललित मोदींशी तुलना केली होती.

दरम्यान आपल्या या वक्तव्यानं राहुल गांधी अडचणीत येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश भाजपाचे प्रवक्ते शलभमणी त्रिपाठी यांनी हा खटला दाखल केला आहे.राहुल गांधींच्या अशा  वक्तव्यामुळे फक्त भाजपा कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण देशभरातील लोकांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे. त्यामुळेच देवरिया न्यायालयात राहुल यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)