नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची रामलीला मैदानावर आज रॅली होत आहे. त्यासाठी दिल्ली काँग्रेसने बार कोड असलेली ४० हजार ओळखपत्रे जारी केली आहेत. या रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांची नेमकी संख्या जाणून घेणे हा यामागील हेतू आहे.
काही नेते सभेतील गर्दीचा आकडा अतिरंजित सांगतात. पण या ओळखपत्रांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांची नेमकी संख्या समजणार आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीतून पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वॉर्ड, ब्लॉक आणि विधानसभा मतदारसंघ यांचा डेटाबेस तयार करण्यासही मदत होणार आहे. याचा उपयोग प्रत्येक वेळी रॅलीसाठी होणार आहे. ही तयारी दोन आठवड्यांपूर्वीच सुरू करण्यात आली. दिल्ली काँग्रेसकडूून होणारे हे शक्तिप्रदर्शनच आहे.
जिल्हा तसेच ब्लॉक स्तरावर नेतृत्व करणाºया प्रत्येक नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्त्यांसाठी ही ओळखपत्रे घ्यायची आहेत. एखाद्या नेत्याने आपल्या भागातील कार्यकर्र्त्यांसाठी १००० ओळखपत्रे घेतल्यास तशी नोंद केली जाईल. त्यानंतर त्या नेत्याच्या भागातून प्रत्यक्ष किती कार्यकर्ते आले, याची तपासणी करता येईल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा