राहुल गांधींच्या भेटीने चर्चेत आलेल्या कलावतींच्या मुलाचा अपघाती मृत्यू

यवतमाळ : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा कलावती यांना पुत्रशोक झाला असल्याचे समोर येत आहे. यवतमाळच्या जळका गावात राहणाऱ्या कलावती बांदूरकर यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले आहे.
बलराम बांदूरकर त्याच्या मित्रासोबत दुचाकीने गावाकडे येत असताना त्याला अपघात झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर कलावती प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांना सात मुली आणि दोन मुले आहेत. त्यापैकी सर्वात धाकट्या म्हणजे 19 वर्षांच्या बलरामचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)