राहुल गांधींच्या जॅकेटवरुन भाजपने केली टीका

शिलॉंग – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिलॉंगमध्ये एका संगीत कार्यक्रमात काळ्या रंगाचे जॅकेट परिधान करुन हजेरी लावली होती. हे जॅकेट काही साधे नव्हते तर त्याची किंमत सुमारे 70 हजार रुपये होती. यावर भाजपने निशाना साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा जॅकेटवरील फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. गतवर्षी राहुल गांधींनी प्रचारसभेत आपला फाटलेला खिसा दाखवला होता.

मेघालय भाजपने प्रसारित केलेल्या त्या ट्विटमध्ये मेघालयच्या सरकारी तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यानंतर ‘काळ्या पैशाच्या सुटाबुटातील सरकारने आमच्या दुखावर गीत गायन करण्याऐवजी मेघालयातील अकार्यक्षम सरकारचा अहवाल सादर करु शकले असते, असे म्हणत त्यांचा फोटही पोस्ट केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)