भाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या कैलास मानसरोवर यात्रेवर असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ‘येथे द्वेष नाही’, असे वाक्‍य लिहुन त्यांनी भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या सरोवराचे पाणी शांत, सुखद आणि आल्हाददायक आहे म्हणूनच भारतात या जलाचे पुजन केले जाते.

दरम्यान, राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेवर गेल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. राहुल गांधी फोटोशॉप करून फोटो शेयर करत आहेत. असा आरोप करत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या कैलास मानसरोवर यात्रेवर प्रश्न उपस्थित केला.

काँग्रेसने सुद्धा गिरिराज सिंह यांना जोरदार प्रतिउत्तर देत हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधींच्या सरोवर यात्रेवरून भाजप मध्ये चांगलेच घमासान रंगले आहे.

राहुल यांच्या मानसरोवर यात्रेचा कॉंग्रेसने दिला पुरावा

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अखेर कॉंग्रेसने पुरावा म्हणून राहुल यांचे मानसरोवर यात्रेतील फोटो आणि त्यांच्या फिटनेस वॉचचे आकडेच जारी केले आहेत. यात राहुल सुमारे 35 किलोमीटर पायी चालल्याचेही स्पष्ट होत आहे. दरम्यान, राहुल यांच्या कैलास मानसरोवरच्या यात्रेवरुन सध्या भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. भाजपाने राहुल गांधींच्या या यात्रेला ढोंगीपण म्हटले आहे. तर भाजपाची ही टिपण्णी म्हणजे एक भिवभक्त आणि त्याच्या भक्तीमध्ये विघ्न असल्याचे कॉंग्रेसने संबोधले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)