राहुल गांधींचे नेतृत्व विरोधक आपोआप स्वीकारतील

कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा

नवी दिल्ली – भाजपच्या विरोधात सर्वच प्रमुख विरोधी पक्षांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होत असला तरी विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे यावरून अजून सर्वसहमती झालेली नाही. तथापी राहुल गांधी यांचे नेतृत्व आज ना उद्या विरोधीपक्ष आपोआप स्वीकारेल असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

ते म्हणाले की, भाजप सरकारला पर्याय म्हणून लोक राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे पहात आहेत. विरोधक आज नाही तर उद्या त्यांना पाठिंबा देतील आम्हाला विश्‍वास आहे. पदुच्चेरी पासून जम्मू काश्‍मीर पर्यंत सर्वांना मान्य होईल असे दुसरे कोणतेही नेतृत्व नाही असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधी हे जोमाने कार्यरत असून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे त्यामुळे त्यांचे नेतृत्वही आपोआपच मान्य होईल. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान म्हणून कोणाला प्रोजेक्‍ट करणार असे विचरता ते म्हणाले की, सर्वात प्रथम भाजपला आणि मोदींना सत्तेवरून दूर करणे हे आमचे प्रमुख उद्दीष्ट आहे आणि त्यानंतर नेतृत्वाचा किंवा पंतप्रधानपदाच्या विषयावर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी देशात जो लढा सुरू आहे त्याचे नेतृत्व राहुल गांधी करीत आहेत. ते देशात जिथे जिथे जातात तेथ लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी करतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बंगालपासून गुजरातपर्यंत मान्यता असलेला दुसरा कोणताही नेता दाखवा, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)