राफेल करार : राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; ‘दसॉल्ट’च्या सीईओंचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – राफेल करारावरून राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपिअर यांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे एरिक ट्रॅपिअर यांनी स्पष्ट केले आहे.

एरिक ट्रॅपिअर म्हणाले कि, राफेल कराराबद्दल मी खोटे बोलणार नाही. मी या कराराचे जी काही कागदपत्रे सादर केली. ती सर्व खरी आहेत. मी तेव्हाही खर बोलत होतो. आजही खरं बोलत आहे. सीईओ पदावर काम करताना मी खोट बोलू शकत नाही.

-Ads-

एरिक ट्रॅपिअर पुढे म्हणाले कि, राहुल गांधीचच्या वक्तव्यामुळे मी दुखी झालो आहे. काँग्रेसच्या सरकार असतानाही आम्ही काम केले असून १९५३ मध्ये जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना आमच्या कंपनीने भारताशी पहिल्यांदा करार केला होता. आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नसून भारत सरकारसाठी काम करतो, अशा शब्दात ट्रॅपिअर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधींनी २ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन दसॉल्ट कंपनीने अनिल अंबानी यांच्या  कंपनीला २८४ कोटी रुपये दिले होते. यातून अनिल अंबानी यांनी नागपूरमध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप केला होता. यावर एरिक ट्रॅपिअर म्हणाले, रिलायन्समध्ये आम्ही कोणत्याही प्रकरणाची गुंतवणूक केली नसून ते पैसे दसॉल्ट आणि रिलायन्सच्या संयुक्त भागीदारी असलेल्या कंपनीत जाणार आहे. संयुक्त भागीदारीत दोन्ही कंपन्या ५०-५० टक्के गुंतवणूक करणार आहेत. आम्ही सुरुवातीला ४० कोटी रुपये दिले असून आगामी पाच वर्षात ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

रिलायन्स कंपनीचीच निवड का केली यावरही एरिक ट्रॅपिअर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राफेलसाठी सुरुवातीला टाटा कंपनीसोबतही चर्चा केली. मात्र त्यावेळी टाटाची अन्य विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरु होती. त्यामुळे आम्ही रिलायन्ससोबत जाण्याचा निर्णय घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)