राहुल गांधींची माध्यमांच्या विरोधात आगपाखड

नवी दिल्ली – काही प्रसार माध्यमे आपल्या विरोधात द्वेषमुलक बातम्या पसरवत आहेत त्याबद्दल राहुल गांधी यांनी त्यांच्या विरोधात उपरोधिक शैलीने आगपाखड केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की सत्याची मोडतोड करून दुष्ट हेतूने आपल्या विरोधात बातम्या पसरवल्या जात आहेत पण आपल्या विरोधात खोट्या बातम्या पसरवून त्यांचे पोट भरत असल्याने त्याबद्दल आपल्याला समाधान आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या खोटारड्या माध्यमांची पोलखोल कोब्रा पोस्टच्या स्टींग ऑपरेशन मधून झाली आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.
देशातील 17 माध्यम संस्थांनी पैसे घेऊन खोट्या द्वेषमुलक बातम्या प्रसारीत करण्याची तयारी दर्शवली असल्याचे कोब्रा पोस्टच्या स्टींग ऑपरेशन मध्ये दिसून आले आहे असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

माझ्या विरोधात जे द्वेषमुलक बातम्या पसरवत आहेत त्यांच्या विषयी मात्र मला बिलकुल द्वेष नाही. त्यांच्यासाठी हा एक व्यवसाय आहे. पैसे घेऊन द्वेष पसरवला जात आहे हे कोब्रा पोस्टने स्टींग ऑपरेशनद्वारे दाखवूनच दिले आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. माझ्या विरोधात अशा बातम्या पसरवून त्यांचे पोट भरत असेल तर मला आनंदच आहे अशी उपरोधिक टिपण्णीही त्यांनी केली आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षानेही कोब्रा पोस्टच्या स्टींग ऑपरेशनची दखल घेऊन म्हटले आहे की या स्टींग ऑपरेशन मुळे माध्यमांचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात येणार असल्याने मुख्य प्रवाहातील माध्यमांनी त्याची दखल घेतली नसावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)