राहुल गांधींची पंतप्रधान बनण्याचं स्वप्नं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने- स्मृती इराणी

लखनऊ: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहत आहेत, तर पाहू दे. स्वप्न पाहण्यास कुठे मनाई आहे. राहुल गांधींची स्वप्नं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत. असा टोला त्यांनी लगावला.

राफेल प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार युद्ध रंगले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना टोले लागले. छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव केला त्यानंतर आता अमेठीत राहुल गांधींचे भावी पतंप्रधान लिहलेले असलेले बॅनर झळकले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर स्मृती इराणी याना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘राहुल गांधींना महाआघाडीत तसा (पंतप्रधानपदाचा) आशीर्वाद ना मायावतींनी दिलाय, ना अखिलेशनं दिलाय. ममता गांधींनीही राहुल यांच्या पंतप्रधानपदाबद्दल अनुकूल भाष्य केलेलं नाही. मग मुंगेरीलालची स्वप्नं पाहायला कोणी मनाई केली आहे?’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)