राहुल गांधींचा पहिल्या यूएई दौऱ्यात मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

दुबईत मी मन की बात करण्यासाठी आलो नाही

दुबई: संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पहिल्या दौऱ्यात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भारतीय कामगारांशी संवाद साधला. दुबईत मी मन की बात करण्यासाठी आलो नाही. तर तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहे, असे त्यांना म्हणत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुबईचा मोठा विकास झालेला दिसतो. येथे उंच इमारती, मोठी विमानतळे आहेत. मेट्रो आहे. तुमच्या योगदानाशिवाय त्यांची उभारणी होऊ शकली नसती. या शहराच्या विकासासाठी तुम्ही घाम गाळला. रक्त दिले आणि वेळही दिली. तुमच्या मेहनतीचा भारताला अभिमान वाटतो. असे असले तरी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे, असे राहुल भारतीय कामगारांना उद्देशून म्हणाले.

आता लढाई सुरू झाली असून त्यात आम्ही जिंकणार आहोत, असे म्हणत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या यशाबद्दल विश्‍वास व्यक्त केला. केंद्रात सत्ता मिळाल्यास कॉंग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा बहार करेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते ओमन चंडी आणि इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा होते. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय कामगारांनी जोरदार घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)