राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान – भाजप

नवी दिल्ली – र्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘वेल डन राहुल गांधी’ असं लिहिलं आहे.

या व्हिडीओत कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के सी वेणुगोपाल राहुल गांधी यांना वंदे मातरमसाठी उभं राहण्यासाठी सांगत असताना, राहुल गांधी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा असं सांगत आहेत. यानंतर वेणुगोपाल यांनी वंदे मातरम गाणाऱ्या व्यक्तीला एका ओळीत संपवून टाकायला सांगताना दिसत आहेत.

-Ads-

दरमयान  काँग्रेसने मात्र भाजपावर टीका करत खोटा व्हिडीओ पसरवला जात असल्याचा दावा केला आहे. भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी देखील याप्रकरणी   राहुल गांधीवर टीका करत ट्विट केलं आहे की, ‘कर्नाटकमध्ये एका प्रचारसभे दरम्यान राहुल गांधींनी एका लाइनमध्ये वंदे मातरम संपवण्यास सांगितलं. म्हणून आम्ही त्यांना शहजादा म्हणतो. हा देश ते आपली खासगी संपत्ती समजतात.ते राष्ट्रीय गीत बदलू इच्छितात का ?’ असा सवाल त्यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)