राहुल आवारे, पृथ्वी शॉ यांना क्रीडा पत्रकार संघाचे पुरस्कार

मुंबई: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा राहुल आवारे, तसेच तेजस्विनी सावंत, हीना सिधू, पृथी शॉ, रिशांक देवडिका, सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर, एस. एस. बाबू नारायण, मेरी डीसूझा, मुरलीकांत पेटकर यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघातर्फे दिले जाणारे क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुंबई क्रीडा पत्रकारांतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांमध्ये राहुल अवारेला त्याच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ठ पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, तेजस्विनी सावंत आणि हीना सिधू यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. तसेच पृथ्वी शॉला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर, रिशांक देवडिकालाही वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच या वेळी सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असून त्यांच्यासोबतच एस. एस. बाबू नारायण, मेरी डीसूझा, मुरलीकांत पेटकर यांना आपापल्या क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी दारा पोचखानावाला, हेमेंद्र व्यास आणि शिवराम सोनवडकर यांचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई क्रीडा पत्रकार संघाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)