राहुरी साखर कारखान्याने सर्वाधिक साखर उतारा मिळविला

श्रीरामपूर – गेल्या चार वर्षांपासून बंद पडलेला राहुरी साखर कारखाना यावर्षी सुरू झाला आणि या कारखान्याने जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत प्रवरा कारखान्यापाठोपाठ सर्वाधिक 12.30 टक्के साखर उतारा मिळविला. याबद्दल त्या-त्या कारखान्याच्या संचालक मंडळाचं कौतुक केले पाहिजे, तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखाना व्यवस्थापनाने प्रवरा व राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या साखर उताऱ्याबाबत शिकवणी लावली पाहिजे, अशी टिप्पणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बबनराव पटारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

पटारे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्याच्या प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील प्रवरा व तनपुरे वगळता अन्य कारखान्यांचा साखर उतारा 11.50 ते 12.00 च्या दरम्यान आहे. तर, प्रवरा (13.10) व तनपुरे, राहुरी (12.90) असा साखर उतारा आहे. जिल्ह्यातील अनेक कारखाने स्वतःच्या कार्यक्षेत्रातील ताज्या उसाचे गाळप करीत आहेत. तर जे कारखाने कार्यक्षेत्राबाहेरून दूरवरच्या अंतराहून मिळेल तो शिळा, वाळलेला, कच्चा ऊस आणून त्याचे गाळप करतात, कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणणारे असे कारखाने कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करणाऱ्या कारखान्यापेक्षा जास्त साखर उतारा मिळवितात हे न समजण्यासारखे आहे. राहुरीचा तनपुरे कारखाना चार वर्षांपासून बंद असून त्याच्या मशिनरीची दुरुस्ती अथवा देखभाल झालेली नाही. असे असतानाही या कारखान्याने उच्चांकी 12.90 टक्के साखर उतारा मिळविल्याचे समजते.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या साखर उताऱ्याची तुलना केल्यास पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर व डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, श्रीशिवाजीनगर या दोन्ही कारखान्यांनी इतर कारखान्यांच्या तुलनेत जवळपास 1 टक्का अधिकचा साखर उतारा मिळविला आहे. त्यामुळे याचे गुपित समजून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर व डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना, श्रीशिवाजीनगर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून साखर उताऱ्याची जादू समजून घेतली पाहिजे, असे पटारे यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)