राहुरी साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Jpeg

नगर – कामागार न्यायालयाने मंजूर केलेल्या रकमा मिळण्यासाठी डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरीच्या आठ निवृत्त कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते 18 मे असे दोन दिवसाचे उपोषण सुरु केले आहे न्याय न मिळाल्यास 19 मे रोजी जीवनयात्रा संपविणार आसल्याचा इशारा या निवृत्त कामगारांनी निवेदनात दिला आहे.
या उपोषण अंदोलनात सावळेराम पांडुरंग भुजाडी, सोन्याबापू जनार्दन सागर, आसाराम नामदेव साळवे, सूर्यकांत बाबुराव कोरडे, बन्सी कोंडाजी गाडे, गोविंद पांडुरंग काळे, चांगदेव जगन्नाथ वाळुंज आणी प्रभू तुकाराम पानसंबळ या आठ जणांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी कारखान्याच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आम्हाला हक्काच्या देय रकमा मिळाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही अहमदनगर कामगार न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने व्याजासह रकमा मंजूर केल्या. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करुनही आम्हाला आमच्या हक्काची रक्कम मिळाली नाही. आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक असून आम्हास चरितार्थासाठी व नियमित औषधोपचारासाठी नादार झालो आहोत. त्यामुळे घरी मरणासन्न जगण्यापेक्षा न्याय मागण्यासाठी आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)