राहुरी तालुक्‍यात संततधार पावसाने कपाशीचे पीक धोक्‍यात

राहुरी – तालुक्‍यात दीड महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर गेल्या आठ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. सलग 28 तास पाऊस पडण्याचा विक्रम झाला. ओढे, नाले सीमा ओलांडून वाहू लागले. तर, शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन, तूर, आदी पिकांना मोठ्या प्रमाणात झळ बसू लागली आहे.

कपाशीची झाडे आपोआप सुकून जात असून, सोयाबीन, तूर पिकांवर पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. एक-दीड महिन्यापूर्वी पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे कपाशी, सोयाबीन पिकांना पाण्याची ओढ बसली. गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांना एकदम भरपूर पाणी मिळाल्याने कपाशीच्या फुलांची गळ होत असून शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्‍त होत आहे.

सध्या कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने फवारणीचाही उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत, तसेच शेतात साचलेले पाणी काढून देण्याचे व सुकलेल्या झाडांच्या खोडाला माती लावण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)