राहुरीचा तुरी शेंगा उत्पादक भावाअभावी अडचणीत

कुरणवाडी, चिंचाळे (ता. राहुरी) - येथील तुर शेंगाचे उत्पादकांनी शेंगाचे भाव घसरल्याने शेंगा तोडणी थांबविली आहे. (छाया - अनिल देशपांडे )

गुजरातला पाठविण्यात येणाऱ्या मालात मोठ्या प्रमाणात घट

राहुरी – गुजरातमधील नागरिकांच्या भोजनातील पसंती म्हणून राहुरी तालुक्‍यातील शेतकरी तुरीच्या शेंगा उत्पादीत करुन तेथे पाठवित होते. यंदा मात्र या तूरीच्या शेंगाचे भाव निम्म्याने कमी झाल्याने तुर शेंगाचे उत्पादक अडचणीत सापडले आहेत. तुरीच्या शेंगाचे भाव चाळीस रुपयांवरुन वीस रुपये किलो इतके घसरले आहेत.राहुरी तालुक्‍यातील किमान तीस ते चाळीस गोण्या भरुन कोवळी तुरीची शेंग गुजरातकडे जात होती. सध्या ही आवक भाव घसरल्याने घटली आहे.

-Ads-

गुजराती लोकांच्या आहारात तुरीच्या शेंगाचे विशेष स्थान आहे. आपल्याकडे जसे शेवग्यांच्या शेंगा अनेक भाजी प्रकारात वापरली जाते. त्याच धर्तीवर तेथील लोकांच्या आहारात तुरीच्या शेंगाचे स्थान आहे. तुरीच्या शेंगा तालुक्‍यातील कुरणवाडी व चिंचाळे येथील शेतकरी उत्पादन घेतात. तुरीचे पीक घेण्यापेक्षा तुरीच्या शेंगा घेणे परवडते असा त्यांचा आठ ते दहा वर्षांचा अनुभव आहे. तुरीचे उत्पादन घेतले तर अर्धा गुंठ्यात तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले तर हमी भावाने तुरीचे 15 त वीस हजार रुपये होतात. त्यातून उत्पादन खर्च वजा केला तर हातात काहीच सापडत नाही.

विशेष म्हणजे हमी भाव जरी पाच हजार रुपये असला तरी प्रत्यक्षात जेमतेम तीन हजार रुपये असाच भाव पदरी गतवर्षी पडलेला होता. त्या अनुषंगाने तुरीच्या शेंगा कोवळ्या असताना तोडल्या तर ते पीक परवडते असा नेहमीचा अनुभव आहे. वीस गुंठ्यात शिवाजी केदारी यांना तीस गोण्या शेंगा मिळाल्या. एका गोणीत सुमारे चाळीस किलो शेंगा या हिशोबाने बाराशे किलो शेंगा मिळाल्या. भाव गतवर्षी तीस ते पन्नास रुपये किलो जागेवर मिळाला.

या परीसरात शेंगांची ही गरज लक्षात घेवून अनेक शेतकरी तुर न घेता तुरीच्या शेंगा घेणे पसंत करतात. वीस गुंठ्यातून दररोज एक ते दोन गोणी शेंगा मिळाल्या तरी त्याचे तीस ते चाळीस रुपये किलो दराने 2 हजार 400 ते 3 हजार 200 रुपये होतात. वीस गुंठे शेतातून हंगामात तीस गोण्या शेंगा मिळतात. त्याचे सरासरी तीस रुपये किलो दराने 36 हजार रुपये होतात. वेचणी शक्‍यतो शेतकरी स्वतः करतात. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. मजुरीचा साधारणतः खर्च बारा हजाराचे आसपास येतो.

वीस गुंठ्यात सरी, नांगरट, बियाणे, रासायनिक खते, शेणखत असा एकूण खर्च बारा ते पंधरा हजार रुपयांच्या आसपास येतो. तर शेंगाचे 36 हजार रुपये होत होते. यंदा मात्र चाळीस रुपये किलोचे भाव अवघे वीस रुपये किलो इतके कमी झाले आहेत. नाशिक भागातून फाफडा यंदा जास्त प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे तुरीच्या शेंगाचे भाव घसरले असल्याचे व्यापारी आर. व्ही दातीर यांनी सांगितले. सर्वसाधारणतः नवरात्रीच्या काळात हे भाव वाढतात असा नेहमीचा अनुभव आहे.त्यामुळे नवरात्रोत्सवाकडे तुर शेंगा उत्पादकांचे लक लागलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)