राही सरनोबतची कामगिरी देशाला अभिमानास्पद – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – आशियाई नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी कोल्हापूरची सुकन्या राही सरनोबतची क्रीडा स्पर्धेतील कामगिरी कोल्हापूरलाच नव्हे तर देशाला अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्‌गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

आशियाई नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेणाऱ्या राही सरनोबत यांच्या यशाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील त्यांच्या घरी जावून सरनोबत कुटुंबियांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी राही सरनोबतचे वडील जीवन सरनोबत, आई प्रभा सरनोबत, काका राजेंद्र सरनोबत, काकी कुंदा सरनोबत, भाऊ अजिंक्‍य आणि आदित्य सरनोबत, वहिनी धनश्री सरनोबत आणि राजेंद्र इंगळे या सर्वांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा राज्य शासनामार्फत गौरव केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महसूल खात्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या राही सरनोबत यांची ही दैदिप्यमान कामगिरी शासनाला विशेषत: महसूल विभागाला प्रेरणादायी अशीच आहे. राही सरनोबत यांनी आंतराष्ट्रीय स्तरावरील 9 वे पदक मिळविले असून त्यांनी आजपर्यंत राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवरील कित्येक पदके पटकावून देशाचा लौकीक वाढविला आहे.

कोल्हापूरला खेळाची मोठी परंपरा लाभली असून एकामागोमाग एक अशी अनेक खेळाडूंची मोठी मालिकाच तयार झाली आहे. विविध खेळ प्रकारात कोल्हापूरच्या खेळाडूंनी कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले आहे. कोल्हापूरच्या अपंग खेळाडूंनीही खेळामध्ये लौकिक निर्माण केला आहे. यापुढील काळात होणाऱ्या पॅराऑलंपिक, युवाऑलंपिक आणि सर्वसाधारण ऑलंपिक स्पर्धेत कोल्हापूरचे 12 खेळाडू खेळणार असून ते 12 जणही स्पर्धेत पदके मिळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)