राहात्यातील “साईराम’मधील दुधात भेसळ ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

साडेसतरा हजारांचे दूध नष्ट

अनेक दूध पिशव्यांवर मुदतबाह्य झालेले परवाना क्रमांक

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर: राहाता तालुक्‍यातील चोळकेवाडी येथील साईराम मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्‍समधील दुधात होत असलेली भेसळ उधळून लावली आहे. अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या संशयावरून गायीचे सुमारे 400 लिटर दूध नष्ट केले आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नष्ट केलेल्या दुधाची किंमत सुमारे 17 हजार 500 रुपये एवढी आहे.

अन्न व औषध प्रशासनाला राहाता येथील साईराम मिल्कमध्ये दुधात भेसळ होत असल्याची माहिती मिळाली होती. सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आदिनाथ बाचकर व उ. रा. सूर्यवंशी यांनी साईराम मिल्क प्रॉडक्‍सवर छापा घातला. साईराम मिल्कची तपासणी केली. येथे गायीच्या दुधाचे पॅकिंग गेले जाते होते. वेगवेगळ्या बॅण्डच्या दुधाच्या पिशव्या पॅकिंगही केल्या जात होत्या. याच साईराम मिल्कमध्ये दूध तपासणीसाठी प्रयोगशाळा आहे. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी साईराम मिल्कमधीलच प्रयोगशाळेत तेथील गायीच्या दुधाची तपासणी केली.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना या तपासणीत गायीचे दूध कमी प्रतीचे आढळून आले. काही दूध पिशव्यांवर मुदतबाह्य झालेला परवानाचे क्रमांक होतो. पिशव्यांवर हाच क्रमांक छापून दुधाची विक्री होत होती. या सर्व प्रकाराची अन्न सुरक्षा अधिकारी बाचकर व सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली. सहायक आयुक्त गोरे यांना अन्न सुरक्षा अधिकारी साईराममधील दुधातील भेसळीची माहिती दिली. गोरे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी भेसळीच्या संशयावरून साईराममधील हे दूध नष्ट केले. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध तपासणीसाठी काही नमुने ताब्यात घेतले आहे. या नमुने सरकारी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तेथील अहवाल प्राप्त होताच, संबंधितांना फौजदारी कारवाई होईल, अशी माहिती सहायक आयुक्त किशोर गोरे (अन्न) यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)