राहात्यातील व्यापा-यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडू

नगराध्यक्षा ममता पिपाडा यांचे आश्‍वासन : शिष्टमंडळाला दिले निवेदन
शिर्डी – राज्यात झालेल्या प्लॅस्टिक बंदीमुळे येणा-या अडचणींबाबत राहाता शहरातील व्यापा-यांचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडू, असे आश्‍वासन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी निवेदन घेऊन आलेल्या शिष्टमंडळास दिले. या वेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, मुख्याधिकारी गावित आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. त्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केल्यामुळे शहरातील छोट्या मोठ्या व्यापा-यांना आठवडेबाजारच्या दिवशी माल विक्री करताना खूप अडचणी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसायाला फटका बसत आहे. यातून काही मार्ग काढावा अशा स्वरूपाची मागणी शिष्टमंडळाने निवेदनात केली आहे. या वेळी नंदू महाले, विलास वाळेकर, ज्ञानेश्वर लुटे, रवींद्र कानकाटे, अमजद शेख इत्यादी व्यापारी उपस्थित होते.
या वेळी पिपाडा म्हणाल्या की, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदी केली. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर ही मानवी जीवनाची एक सवयच बनली आहे. परंतु, त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा आपण कधी विचार केलाच नाही. प्लॅस्टिक हे अविघटनशील असल्यामुळे ते मानवी जीवनासाठी व पर्यावरणासाठी घातक आहे. यामुळे राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. आपण दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून आपले प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडू, असे आश्‍वासन या वेळी दिले. उपस्थितांना ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकून राहाता नगरपालिकेस सहकार्य करावे, तसेच पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे उपस्थितांना आवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)