राहाता पंचायत समितीला यशवंत पंचायतराज

अभियानाचा प्रथम क्रमाकांचा पुरस्कार
राहाता  –  केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापणाचा उत्कृष्ठ दर्जा राखल्यामुळे राहाता तालुका पंचायत समितीला सन 2017-18 या वर्षातील यशवंत पंचायतराज अभियानाचा विभागीय स्तरावर प्रथम क्रमाकांचा रुपये 11 लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्था मार्फत राबविल्या जातात. या कामगिरीसाठी पंचायतराज संस्थांना प्रोत्साहीत करुन कार्यसंस्कृती वाढविण्याच्या उद्देशाने 2005 आणि 2006 या आर्थिक वर्षांपासुन राज्य शासनाने यशवंत पंचायतराज अभियान या नावाने पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. याच अनुषंगाने 2017 आणि 18 या वर्षांत राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच विविध राबविलेले सामाजिक उपक्रम यामुळे विभागीय स्तरावर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा रुपये 11 लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे सभापती हिराबाई कातोरे आणि उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने केलेला पाठपुरावा आणि तालुक्‍यातील विकासाच्या संदर्भात युवा नेते डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व गावांना विकास प्रक्रियेत सामावुन घेण्यासाठी केलेली प्रभावी कार्यवाही आणि शासन आपल्या दारी या उपक्रमातून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच प्रशासकीय स्तरावर राहाता पंचायत समितीचा दर्जा गुणात्मकदृष्ट्या यशस्वी झाला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस या उपक्रमांबरोबर वेळेवर घेण्यात आलेल्या मासिक सभा, सामाजिक बांधिलकीतुन प्लॅस्टीक बंदी, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, आरोग्य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम, हागणदारी मुक्‍त तालुका आणि माहीती आधिकार कार्यशाळा या बरोबरच लेखा परिक्षणाची वेळोवेळी पुर्तता करण्यात सातत्य राखल्यामुळेच राहाता पंचायत समितीला विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळण्यात यश आले असल्याचे गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले.

-Ads-

सांघिक प्रयत्नांचे यश
राहाता पंचायत समितीला विभागीय स्तरावर मिळालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हे सांघीक प्रयत्नांचे यश असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्‍त केली. पंचायत समितीच्या माध्यमातुन पदाधिकारी, आधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिकपणे निर्णयांची केलेली अंमलबजावणी, उपलब्ध झालेल्या निधीचा योग्य विनीयोग आणि प्रशासकीय कामात दाखविलेली तत्परता यामुळेच हे मोठे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)