राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साडेदहा कोटींचा पीक विमा मंजूर

राहाता – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 10 कोटी 52 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे.

तालुक्‍यातील पेरू पिकासाठी 215 शेतकऱ्यांनी 367 हेक्‍टर क्षेत्राचा पीक विमा भरला होता. डाळिंब पिकासाठी 2 हजार 390 शेतकरी लाभार्थी असून, त्यांनी 1 हजार 923 हेक्‍टरचा पीक विमा भरला होता. चिकू पिकासाठी 23 शेतकऱ्यांनी 20 हेक्‍टरचा पीक विमा भरला होता. या सर्व पिकांसाठी 44 लाख 74 हजार 600 रुपये मंजूर झाले आहेत. डॉ. विखे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 794 शेतकऱ्यांचे 3 कोटी 98 लाख रुपये पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या राष्ट्रीयीकृत बॅंक खात्यात वर्ग झाले आहे. उर्वरित 1 हजार 833 शेतकऱ्यांचे 6 कोटी 54 लाख जिल्हा बॅंकेत लवकरच वर्ग होणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)