रास, दांडियासाठी जुन्या सदाबहार गाण्यांची “क्रेझ’ कायम

पिंपरी – नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडीयावर ठेका धरण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे. पसंतीच्या गाण्यावर गरबा आणि रास दांडिया खेळण्यासाठी गाण्यांची निवड तरूणाई करताना दिसत आहे. नवीन गाण्यावर नृत्य करताना जुन्या सदाबहार गाण्यांची “क्रेझ’ कायम असल्याची माहिती यांनी दिली.

यंदा नवीन गाण्यामध्ये गरबा खेळण्यासाठी “हेथल पुरमा आवे ओ छोरीया’ या गाण्याला तरूणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याच्या जोडीला अजून एक नवीनच गाणे आहे. “हो आवी गयी रात’ या गाण्यावरही तरूणाई गरबा आणि रास दांडिया खेळताना दिसून येणार आहे. तसेच फाल्गुनी पाठक हिच्या अल्बमला देखील तरूणाईकडून अजूनही मागणी आहे. नव्वदच्या दशकातील गाण्यांना देखील अजूनही तेवढीच मागणी आहे. तसेच “ढोलीडा ढोल रे बगाडे’, “आंबे मॉं चालो धीरे धीरे’, “ओढणी ओढू ओढू ने उडी जाय’ या गाण्यांना मोठी मागणी असल्याची माहिती डिजे ऑपरेटर गणेश साळुंखे यांनी दिली.

-Ads-

अजमेरा कॉलनीत आणि आई माता मंदिरात पारंपरिक पद्धतीनेच नवरात्रोत्सव गुजराती आणि राजस्थानी बांधवांकडून साजरा करण्यात येतो. पिंपरीगाव, चिखली, सांगवी, थेरगाव, भोसरी, निगडी, प्राधिकरण, दापोडी आदी भागात राजकीय मंडळींकडून रास, दांडिया स्पर्धेचे आयोजन केले जाते. लाखोंची बक्षीसे त्यासाठी ठेवली जातात. काही नवरात्रौत्सव मंडळांकडून सिनेतारकांना दांडियासाठी निमंत्रित केले जाते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुक नेत्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर रास, दांडिया स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

नवरात्रौत्सवाला “इव्हेंट’चे स्वरुप
शहरात गरबा आणि दांडीया खेळण्यासाठी सोसायटीमध्येच तशी व्यवस्था करण्यात येत असते. सोसायटीच्या असलेल्या मंडपात सगळ्या सोई-सुविधा करण्यात येतात. तसेच काही उच्च भ्रू वस्तीतील नागरिकांसाठी शहरातीलच काही ठिकाणी गरबा खेळण्यासाठी नियोजन करण्यात येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. तसेच शहरातही काही ठिकाणी दांडिया शिकण्यासाठी नवरात्रोत्सवाला सुरूवात होण्याच्या आधीच प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. शहरात रास-दांडिया खेळणाऱ्या पथकांची संख्या वाढत आहे. यामुळे नवरात्रोत्सवाला इव्हेंटचे स्वरुप येत असून त्यातून उत्पन्नाचे साधन तयार होऊ पाहत आहे.

नवरात्रौत्सवात विविध मंडळातर्फे रास, दांडियाचे आयोजन केले जात असताना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करायला हव्यात. तसेच नृत्य करताना देखील पारंपरिक कपड्यांचा उपयोग केला जावा. यामुळे गरबा आणि रास दांडिया खेळण्याचा आनंद द्विगुणीत होईल.
                                                    – कन्हैया ओझा, नागरीक.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)