रासेयो ही व्यक्तिमत्व घडवणारी शाळा – वल्लभ शेळके

बेल्हे- राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्व घडवणारी शाळा असते, असे मत वल्लभ शेळके यांनी राजुरी (ता.जुन्नर) येथे व्यक्त केले.
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मंगळवार (दि. 1) ते सोमवार (दि. 7) या दरम्यान राजुरी येथे होत आहे. या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, राम गटकळ, डॉ.लक्ष्मण घोलप, मुन्ना कुऱ्हाडे, रमेश औटी, अशोक औटी, काशिनाथ औटी,पांडुरंग औटी, शिवाजी औटी, काशीनाथ हाडवळे, रामदास औटी, आप्पाजी औटी, पोपट फावडे, माऊली फावडे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. कृतज्ञता आणि कृतार्थ भाव विद्यार्थ्यांनी अंगी जोपासावा. नम्रता आणि सहनशीलता, वक्तशीरपणा यांचा तंतोतंत वापर जीवनात करण्यासाठी शिबिरातील उपक्रम महत्त्वाचे आहेत.प्रतिकुल परिस्थितीतच माणसाच्या तत्त्वनिष्ठेची परीक्षा होत असते. ग्रामीण भागातील समस्या आणि त्यावर उपाययोजना या शिबिरातून करता येणं शक्‍य आहे. स्वावलंबन, संघटन कौशल्य या गुणांचा विकास होण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असते. प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप यांनी आपल्यातील एका वाईट दुर्गुणाचा त्याग या शिबिरातून व्हावा म्हणून प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप गाडेकर यांनी केले, प्रास्ताविक डॉ. लक्ष्मण घोलप यांनी, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना तालुका समन्वयक प्रा. सचिन शेळके यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)