रासायनिक खतांच्या वापराने होते जमीन नापीक

विठ्ठल गोरे : चांदखेड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण

पिंपरी – गरजेपेक्षा अधिक पाणी व रासायनिक खतांचा वापर केल्यास जमीन नापीक होईल, असे प्रतिपादन ऍग्रोनॉमिस्ट व फिनोलेक्‍स (उर्से) कंपनीचे उप महाव्यवस्थापक विठ्ठल गोरे यांनी केले आहे. रोटरी क्‍लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

-Ads-

रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्ट, पिंपरी, सिनर्जी, गणेशखिंड, सारसबाग या पाच रोटरी क्‍लबच्या वतीने व रोटरी क्‍लब कोलंबिया (अमेरीका) यांच्या सहकार्याने संयुक्‍त प्रकल्प अभियानात चांदखेड येथील ओढयातील गाळ काढण्याचा उपक्रम गेल्या वर्षी हाती घेण्यात आला होता. याचा फायदा होऊन या वर्षी ओढयात व परिसरातील विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. रविवारी चांदखेड येथे शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनावर विविध पिकांची लागवड, पाणी व्यवस्थापनाचे फायदे व तोटे, शासकीय सवलती, याबाबत गोरे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.

यावेळी रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्टचे प्रकल्प अध्यक्ष ऍड. विजय शहा, प्रमोद बेंद्रे, प्रकाश कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र पारसनीस, रमण खिंवसरा, चांदखेड रोटरी ग्रामसभेचे अध्यक्ष सचिन गायकवाड, उपसरपंच पौरस बारमुख, शेती प्रकल्पाचे अध्यक्ष नितीन गायकवाड, ग्रामस्थ शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

जलसंधारण क्षेत्रातून निर्माण झालेल्या पाण्याचा वापर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केला पाहिजे. याबाबत शासनाने परिपत्रक देखील 2015 साली काढले आहे, मात्र दुर्देवाने शेतकरी याचा उपयोग करत नाहीत. शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलण्याची परवानगी आहे. परंतु ठिबक सिंचनानुसार त्या पाण्याचा वापर शेती उत्पादनासाठी केला पाहिजे. आपण पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहोत याची जाणीव प्रत्येकानी ठेवली पाहिजे. आपल्या गावातील पाण्याचे व्यवस्थापन करणे काळाचीच गरज आहे. प्रत्येक पाण्याचा थेंब पिकासाठी उपयोगी व्हावा पाणी वाया जावू नये हा प्रशिक्षणामागील हेतू आहे. उसाचे पीक ठिबक सिंचनाव्दारे घेतले नाही तर 70 टक्के पाणी वाया जाते. यावेळी रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष बेंद्रे यांनी मनोगत व्यक्‍त केले तर आभार रोटरीयन प्रकाश कुलकर्णी यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)