संयुक्तराष्ट्रे – सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी त्यांच्या देशातील इडलिब प्रांतातील गनिमांच्या विरोधात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना या अस्त्रांचा वापर करण्यास अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस या देशांनी सक्त विरोध केला आहे. त्यांनी या अस्त्रांचा वापर केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे. इडलिब प्रांत हा सीरियातील गनिमांच्या ताब्यात आहे, त्यांच्या ताब्यातून हा प्रांत सोडवण्यासाठी रासायनिक अस्त्रे वापरण्याचा अध्यक्ष बशर असद यांचा इरादा आहे.

या अनुषंगाने तिन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्धीला दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की इडलिब प्रांतात जो संघर्ष सुरू झाला आहे तो चिंताजनक आहे. त्यातच अध्यक्षांनी रासायनिक अस्त्रे वापरली तर त्याच्या तेथील नागरी जीवनावर भीषण परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत आम्हालाच तेथे हस्तक्षेप करावा लागेल असे या तिन्ही देशांनी म्हटले आहे.

घौटा येथे करण्यात आलेल्या रासानिक हल्ल्याच्या घटनेला पाच वर्ष झाल्याच्या निमीत्ताने त्यांनी हा इशारा दिला आहे. रासायनिक अस्त्रांचा वापर आम्हाला रोखावाच लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सीरियाच्या विरोधात या तिन्ही देशांनी तेथे हवाई हल्ले केले होते. तशाच स्वरूपाची कारवाई पुन्हा होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)