रासाटी अंगणवाडी घुमला बेटी बचाव …बेटी पढाओचा नारा

रासाटी ः बेटी बचाव... बेटी पढाओचा नारा देताना विद्यार्थी.

कोयनानगर, दि. 16 (प्रतिनिधी)- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाटण अंतर्गत हेळवाक दोन अंतर्गत रासाटी अंगणवाडी क्र. 18 व 19 मध्ये आयोजित केलेला बेटी बचाव बेटी पढाओ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
अंगणवाडी सेविका सुनीता शेलार, स्मिता कांबळे यांनी किशोरवयीन मुलींना जीवनसत्वयुक्त आहार व निरोगी आरोग्य कसे राखावे याची माहिती देवून नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किशोरवयीन मुली व महिलांनी मोफत हिमोग्लोबीन तपासून घ्यावे असे सांगून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास रासाटी सरपंच सुरेखा कदम, उपसरपंच अश्विनी सपकाळ, सदस्या अनिता कदम, माजी उपसरपंच प्रदीप पाटील, ग्रामसेवक माने दीपक कदम, एल. टी. जाधव, रुपेश पाटील, बंडू कदम, मदतनीस कमल सुतार आदी प्रमुख उपस्थित होते. सर्वाचे स्वागत अंगणवाडी सेविका सुनीता शेलार यांनी तर आभार स्मिता कांबळे यांनी मानले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)