राष्ट्र निर्माणासाठी कायदे लोकाभिमुख होणे गरजेच

नगर – शासन कायदे करीत असते, परंतु त्या कायद्याची माहिती समाजाला नसते. ती माहिती जिल्हा विधी व प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम केले जाते. बालक पुढे नागरिक होणार आहेत. त्यांना आपण सक्षम करण्यासाठी कायद्याची निर्मिती केली आहे. आपल्या बालसंपत्तीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. बालकांना हक्क, न्याय मिळाला पाहिजे. शासन काम करीत असते, परंतु त्या कामात लोकसहभाग गरजेचा आहे. त्यामुळे हे कायदे अधिक लोकाभिमुख होतील. कायदे मुले व नागरिकांपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. यातून आपण चांगले राष्ट्र निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.

नगर तालुक्‍यातील जेऊर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभागांच्या वतीने मुलांच्या न्याय हक्कासाठीच्या विशेष कायदेविषयक शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक हुड, जिल्हा न्यायाधीश पी. आर. भावके, जि. प. मुय कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, सरकारी वकील सतीश पाटील, बार असो.चे अध्यक्ष सुरेश ठोकळ, सरपंच मधुकर मगर, सचिव पद्माकर केस्तीकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)