राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुरुकुल शिक्षणाला देणार प्रोत्साहन

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना ‘भारतीय शिक्षण मंडळ’ आता गुरुकुल प्रणालीला चालना देण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आयोजन करणार आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात उज्जैनमध्ये ‘विराट गुरुकुल संमेलना’चे आयोजन मध्यप्रदेश सरकारसोबत मिळून केले जाणार आहे. या संमेलनात गुरुकुल व्यवस्था सुरू करण्याची इच्छा असणाऱया अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

गुरुकुल सुरू करण्यासाठी इंडोनेशिया उत्सुक असून याकरता तेथील सरकारने हिंदू स्वयंसेवक संघाच्या सदस्यांशी संपर्क साधला आहे. याबद्दलची जबाबदारी संघाने भारतीय शिक्षण मंडळाला सोपविली आहे. इंडोनेशियाचे सरकार प्रारंभी 15 गुरुकुल सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

गुरुकुलबद्दल अधिक माहिती मिळविण्याच्या उद्देशाने विराट गुरुकुल संमेलनात इंडोनेशियाचे प्रतिनिधी सहभागी होतील. याचबरोबर मॉरिशस, त्रिनिदाद, हॉलंड आणि नॉर्वेचे प्रतिनिधी देखील संमेलनात सामील होतील. हे सर्व देश गुरुकुल सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या देशांमध्ये गुरुकुलसमान व्यवस्था अगोदरपासून चालत आली आहे, त्या देशांचे प्रतिनिधी देखील संमेलनात स्वतःचे अनुभव मांडतील. यात नेपाळ, भूतान आणि म्यानमारचा समावेश असल्याची माहिती भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)