राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता थेट राहुल गांधीना आमंत्रण ?

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता थेट राहुल गांधी आणि सीपीएम महासचिव सीताराम येचुरी तसेच अन्य नेत्यांना एका कार्यक्रमात आमंत्रित केले आहे. यापूर्वी आरएसएसने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नागपूर येथे एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान, संघाने दिल्लीत होणाऱ्या ‘भविष्य का भारत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टीकोन’ या कार्यक्रमात राहुल गांधी आणि अन्य विरोधी नेत्यांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम १७ ते १९ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ताज्या वृत्तानुसार संघ प्रमुख मोहन भागवत यामध्ये प्रबुद्ध लोकांशी संवाद करतील. नुकतेच विदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी संघ आणि भाजपवर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात फूट पाडण्याचे काम करत असून देशात द्वेष निर्माण करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)